05 October, 2008


राजगड ..पुन्हा एकदा
तर ... मागे म्हटलं तसं मी गडांचा राजा ~ राजगडाला भेट देऊन आलो. भेट देऊन आलो .... अररर्र काही तरी चुकीचं वाटतंय. पण काही अर्थाने माझ्याबाबतीत ते खरं आहे. मी ३-४ महिन्यातून कधीतरी एकदा पुण्याला जातो. त्यातही कुठल्यातरी गडावर जाण्याची संधी मिळावी असं मनापासून वाटतं. असो.राजगड, हरीश्चंद्रगड, मागच्या बाजूने जीवधन-नानेघाट, तोरणा अश्या ठिकाणी जाताना मस्त मजा येते. काय ते.... अनुभवण्याची गोष्ट आहे.. म्हणजे, कधी गंभीर चर्चा करत, कधी जुन्या आठवणी उगाळत, कधी उगाचच उनाडक्या करत तर कधी अगदीच काहीही न बोलता शांतपणे चालयचं, चढायचं !! प्रदुषणमुक्त, स्वच्छ मोकळी, मंद हवा. समोरची दूरवर पसरलेली हिरवळ. चढताना कोरडा पडणारा घसा, दर १५-२० मिनीटांनी मारायला लागणारी फ़तकल. असो.तर ...

No comments:

marathi blogs widget

aapko yeh blog kaisa laga